जयंत पाटलांच्या कामाचा असाही सपाटा, झोपेचाही पडला विसर

पाटलांचा मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस बुधवारी पहाटे पाच वाजता संपला.

75

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सर्वांनाच त्यांच्या कामाचा सपाटा पहायला मिळाला. जयंत पाटील यांचा मंगळवारी सकाळी ९ वाजता सुरू झालेला दिवस बुधवारी पहाटे पाच वाजता संपला.

दिवसभरात अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

बीड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले. मंत्री जयंत पाटील यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.

(हेही वाचाः कांदेंना आली धमकी, भुजबळांनी काय केले? वाचा)

कार्यकर्त्यांशी संवाद आणि विभागाचा आढावा

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील राज्यभर पक्षाचा आढावा घेत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने ते मंगळवारी बीड जिल्ह्यात होते. पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा तसेच मतदारसंघांचा आढावाही घेतला.

WhatsApp Image 2021 09 29 at 11.13.20 AM

कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी देत त्यांनाही दिले बळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या तीन वर्षांपासून पक्षाशी प्रत्येक माणूस जोडत आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी बीड व परभणी येथे असताना डॉ. मधुसूदन केंद्रे, डॉ. नरेंद्र काळे, ॲड. तोतला, उषाताई दराडे आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गाठीभेटी घेत त्यांनाही जयंत पाटलांनी बळ दिले.

(हेही वाचाः आता मोफत ‘शिवभोजन’ बंद होणार! किती रुपये मोजावे लागणार? वाचा)

रात्री १०.३० वाजता जलसंपदा विभागाची बैठक

पक्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची संबंधित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक रात्री १०.३० वाजता घेतली.

१२.३० वाजता मेहबूब शेख यांच्या घरी भेट व भोजन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आपल्या शिरुर कासार येथील निवासस्थानी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. उशीर झाला म्हणून बीडवरुन शिरुर कासार येथे जाणे शक्य नव्हते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मंत्री जयंत पाटील शिरुर कासार येथे गेले तेथे त्यांनी रात्री १०.३० वाजता भोजन केले. त्यानंतर रात्री दोन वाजता निघून अहमदनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता ते आढावा बैठकीला पोचले.

(हेही वाचाः हसन मुश्रीफ सोमय्यांना का म्हणाले, ‘हे वागणं बरं नव्ह!’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.