शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीच्या पक्षातील गळती काही थांबायचे नाव घेत नाहीये. सातत्याने कोणतांना कोणता नेता इतर पक्षात प्रवेश करत आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रावादीचे मराठावाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आमदार विक्रम काळेंच्या विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विक्रम काळेंना परभणीमध्ये धक्का बसला आहे. ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भारतीय यांनी भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे परभणीतील राष्ट्रवादीला हादरा बसला आहे.
भाजपात प्रवेश केलेले सुभाष भारतीय आमदार विक्रम काळेंचे अत्यंत विश्वासू समजले जातात. पण आता भाजपाच्या गोटात सुभाष भारतीय सामील झाल्याने मराठवाड्यात मताची विभागणी होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांवर या प्रवेशामुळे भाजपाला फायदा होतो की नाही? हे येत्या काळात समजेल.
मविआचे ५ मतदारसंघातील उमेदवार कोणते?
- नाशिक पदवीधर मतदारसंघ – शुभांगी पाटील
- अमरावती पदवीधर मतदारसंघ – धिरज लिंगाडे
- नागपूर शिक्षक मतदारसंघ- सुधाकर अडबाले
- कोकण शिक्षक मतदारसंघ- बाळाराम पाटील
- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ – विक्रम काळे
(हेही वाचा – शिवसेना ठाकरे गटाच्या वाघिण, फायरब्रँड नेत्या नाराज)
Join Our WhatsApp Community