आयुष्यभर माझ्याच पादत्राणांची पूजा केली! एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला 

162
जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधून विस्तवही जात नाही, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. गिरीश महाजन यांनी खडसे यांची ‘मंदिरात गेले आणि चप्पल चोरीला गेली’ अशी  स्थिती झाली आहे, अशी टीका केली. त्यावर आमदार खडसे यांनी गिरीश महाजनांवर ‘गिरीश महाजनांनी आयुष्यभर माझ्याच पादत्राणांची पूजा केली’, अशा शब्दांत टीका केली.
खडसेंना राष्ट्रवादीकडून विधान परिषद मिळाली, पण त्यांचे सरकार गेले, त्यामुळे सोशल मीडियावर खडसेंवर विनोद होत आहेत. या विनोदाचा आधार घेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता खडसेंनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे. ‘गिरीश महाजन बालिश आहेत, प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली, आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष असतं. पण, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही’, अशी बोचरी टीका खडसे यांनी केली.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

एकनाथ खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकार कोसळले, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली होती. ‘एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी त्यांची स्थिती झाली आहे’,  अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली होती
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.