खासदार सुप्रिया सुळेंसह पती सदानंद सुळे कोरोना पॉझिटिव्ह

105

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होत असल्याने राज्यात कोरोनाचे कडक निर्बंध पुन्हा एकदा लादण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

असं केलं सुप्रिया सुळेंनी ट्विट

“मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.”, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये खासदार म्हटले आहे.

(हेही वाचा-महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध अजून कडक होणार? राजेश टोपेंचा इशारा)

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध!

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या आठ दिवसात २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होण्याचा अंदाज आहे. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. दोन दिवसात रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्ही दर हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.