Former Home Minister अनिल देशमुखांचे पुस्तक फुकट दिले तरी कोणी वाचणार नाही; नेटकऱ्यांनी Supriya Sule यांनाही केलं ट्रोल!

102
Former Home Minister अनिल देशमुखांचे पुस्तक फुकट दिले तरी कोणी वाचणार नाही; नेटकऱ्यांनी Supriya Sule यांनाही केलं ट्रोल!
Former Home Minister अनिल देशमुखांचे पुस्तक फुकट दिले तरी कोणी वाचणार नाही; नेटकऱ्यांनी Supriya Sule यांनाही केलं ट्रोल!

माजी गृहमंत्री (Former Home Minister) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ‘द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ या पुस्तकावर बंदी घालण्याचा सरकार विचार करीत असल्याचे समजते,’ अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी समाजमाध्यमावर केली. मात्र, नेटकऱ्यांनी सुळे यांच्यावर अविश्वास दाखवत, ‘पुस्तक खपवण्यासाठी केलेला हा पब्लिसिटी स्टंट आहे का?’ असा सवाल करत प्रचंड ट्रोल केले.

नेमकं काय पोस्ट केली?

सुप्रिया सुळे (Supriya Sule) या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात: “माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) साहेब यांच्या ‘द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ या पुस्तकावर बंदी घालण्याचा सरकार विचार करीत असल्याचे समजते. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकावर बंदी घातल्यास अभिव्यक्तीचा आवाज दडपला जाईल हे स्पष्ट आहे. पण या सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही सत्याचा आवाज कधीही कुणाला कायमस्वरूपी दडपता येत नाही. अंतीम विजय सत्याचाच होतो.”

(हेही वाचा – Flowers Price : उन्हाळ्यात फुलांची मागणी वाढली, किंमती शिखरावर)

यांचा मूर्खपणा पोटात घालू नका

यावर अनेकांनी अविश्वास व्यक्त करत इतरही प्रश्न उपस्थित केले. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी हे पुस्तक म्हणजे आत्मकथा असल्याचे म्हटले आहे. त्यालाच आक्षेप घेत एकाने पुस्तक केवळ गृहमंत्री असतानाच्या दोन वर्षाच्या कालावाधितील असल्याचे सांगितले. एकाने तर उपरोधिकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना टॅग करत, ‘@Dev_Fadnavis कृपया बंदी आणून या लोकांची मूर्खपणा पोटात घालू नका. या पुस्तकाची मीमांसा (सत्य आधारित चिरफाड) करणाऱ्या पुस्तकासाठी निधी द्या आणि या पुस्तकाच्या प्रतीसोबत मोफत वाटा,’ अशी मागणी केली.

(हेही वाचा – Jalgaon मध्ये बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदप्रकरणी ४३ बांगलादेशी घुसखोरांवर गुन्हा दाखल)

याशिवाय इतरही प्रतिक्रिया काही प्रमाणात मनोरंजनात्मक आहेत, त्या खालीलप्रमाणे त्यांच्या शब्दांत:
  • ‘या पुस्तकाला बारामतीतलं शेंबडं पोरगं सुद्धा सिरीयसली घेणार नाही म्हणून अशी हवा करावी लागत्ये तुम्हाला’
  • ‘ही अफवा आधी एकदा पसरवून झाली आहे. पुस्तक खपणार नाही.’
  • ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री महात्मा अनिल देशमुख यांचे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे. त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला दिलेला, “संघटित व्हा, वसुली करा आणि साहेबांकडे जमा करा” हा ऐतिहासिक संदेश राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरला गेला आहे. याबद्दल त्यांना परमबीर चक्र दिले पाहिजे.’
  • ‘नाव आत्मकथा आणि पुस्तक गृहमंत्री असतानाच्या २ वर्षातील.. अशी पुस्तकं लिहून सत्य सिद्ध होत नसतं. खंडणीच्या आरोपातून न्यायालयात सिद्ध करा निर्दोषत्व’
  • ‘दरमहा 100 कोटींची खंडणी घेत “असा आरोप असलेला गृहमंत्री … त्याच्या डायरीवर किती विश्वास ठेवणार, जो स्वतः प्रकृती अस्वस्थ चे खोटे कारण देऊन कोर्टातून जमीन मिळवतो तो खरे बोलणार? कदापि नाही’
  • ‘एक सोपा पर्याय सुचवू का? तुम्ही छापा आणि लोकांमध्ये वाटा याच्या प्रती. आधी तुमच्या कार्यकर्त्यांना वाचायला सांगा मग बघू. ताई किती चमकायचा प्रयत्न करता हो? २१व्या शतकत राहतो आपण-पूर्वी पुस्तकं छपाई बंद व्ह्यायची आता लोक स्क्रीन वर सुध्दा वाचतात, असं बंद वैगेरे करून कसं बरं होईल’
  • ‘पुस्तक खपवायची सुपारी घेतली की काय?’
  • ‘कपोलकल्पित कहाण्या लिहून राळ उडविण्यापेक्षा उपलब्ध माहिती आधारे तक्रारी दाखल कराव्या.. त्याचा पाठपुरावा करावा. सिस्टम मध्ये असून जर तुम्ही स्वच्छता करणार नाही तर बाहेरचे लोक तर करूच शकणार नाहीत.. ऐकीव गोष्टी तर पत्रकार पण सांगतात.. ठोस काही करा..’
  • ‘He was the 1st Twitter Home Minister of India. Govt should not ban his book, if they are planning, they should release it in comic section.’
  • ‘साधी एक कविता पोस्ट केली तर एका मुलीला ४० दिवस तुरूंगात डांबणाऱ्या शरद पवारांच्या कन्या आहात तुम्ही, तुमच्या तोंडून या मुद्यावर बोलणे हास्यास्पद आहे. बोलता तुम्ही पण लोक हसतात तुमच्या बाबांवर.’
  • ‘काही बंदी वगैरे नाही … पुस्तक खपावे म्हणून केलेला स्टंट आहे … पण यांचे पुस्तक कोण घेणार विकत? एक मनसुख हिरेन चा चॅप्टर टाका … नक्की खपेल पुस्तक.’
  • ‘100 कोटी टार्गेट बद्दल कितपत खरे बोलले असतील , सचिन वाझे, जिलेटीन प्रकरण, ह्या बद्दल किती खरे बोललेत आहेत जरा खुलासा करावा. बाकी ह्याच्या गृहमंत्री कारकीर्दीत सगळ्यात जास्त महारष्ट्र पोलिस बदनाम झाले हे मात्र खरे. इतर गृहमंत्री पेक्षा.’
  • ‘खुलासे करून काय उपयोग, तुमचं सगळं खरं असेल तर कोर्टात केस करा की. नुसतं पुस्तक लिहून खुश होणार व्हय? ढोंगी बई, ढोंगी पक्ष.’

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.