भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपवर विरोधकांनी निशाणा साधला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी हे आपले आवडते पंतप्रधान असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या सुळे?
केंद्र सरकारच्या विरोधात मी काहीही लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे आवडते पंतप्रधान असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळातील सा-यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
(हेही वाचाः राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)
राज्यपालांच्या वक्तव्याबाबत नाराजी
तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, मात्र ती चूक वारंवार करणं ही त्यांची चॉइस आहे. त्यामुळे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर आंदोलन करण्याचा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला आहे.
Join Our WhatsApp Community