अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या या पोस्टचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सप्रिया सुळे यांनी या तिघांचेही आभार मानले आहेत. हीच आपली संस्कृती असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
(हेही वाचाः पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी)
हीच आपली संस्कृती
शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टमुळे केतकी चितळे चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्या या पोस्टचा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसी येथे झालेल्या सभेत केतकी चितळेचा जाहीरपणे समाचार घेतला, तर त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध करत केतकीच्या पोस्टचा निषेध केला होता. ही मानसिक विकृती असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले होते.
(हेही वाचाः केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केतकीच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या तिघांचेही सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत. या तिघांनीही घेतलेल्या भूमिकेबाबत मी त्यांना धन्यवाद व्यक्त करते. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
कायदा आपलं काम करेल
केतकी चितळेला मी ओळखत नाही. त्यामुळे तिच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. पण अशा पद्धतीने पोस्ट करणं, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणं ही आपली संस्कृती नाही. याबाबतीत कायदा आपलं काम करेल, असे मत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
(हेही वाचाः केतकी चितळेच्या पोस्टवर काय म्हणाले शरद पवार? )
Join Our WhatsApp Community