केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सोमवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तेला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. यापुढे जर कुठल्याही महिलेवर हात उगारण्याचा प्रयत्न झाला तर मी हात तोडून हातात देईन, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यावरुन आता महिला सुप्रिया सुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तेला केलेली मारहाण तुम्ही पाहिलीत का? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांनी आपल्याला महिलांचा सन्मान करायला शिकवले आहे. त्यामुळे आजनंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेच्या अंगावर हात उचलण्याचं प्रयत्न केला. तर मी त्याच्या विरोधात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन, असा थेट इशारा देत सुप्रिया सुळे यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community