तुरूंगात असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख फ्लोर टेस्टमध्ये (बहुमत चाचणी) मतदानाचा हक्क मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिक आणि देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात तशी याचिका दाखल करून त्यांनाही अधिकार द्यावा, अशी विनंती केली आहे. दरम्यान, या याचिकेवर संध्याकाळी 5.30 वाजता सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
(हेही वाचा – “जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू”, गुलाबराव पाटलांचे राऊतांना चोख प्रत्युत्तर )
राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते मनी लाँड्रिंगच्या वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात असून यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नव्हता. यासह दोघांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही मतदानाचा हक्क मागितला होता. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन मते कमी झाले होते. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या, गुरूवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन सभागृहात सरकारचे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर उद्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.
NCP leaders Nawab Malik and Anil Deshmukh, who are lodged in jail, move Supreme Court seeking permission to attend the floor test in Maharashtra tomorrow.
Supreme Court agrees to hear their plea today evening.
(file pics) pic.twitter.com/0YC0cClLPh
— ANI (@ANI) June 29, 2022
राज्यातील राजकीय सत्ता संघर्ष झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेने राज्यपालांच्या सभागृहात बहुमत चाचणी घेण्याच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अद्याप प्रलंबित असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगणे योग्य नसल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community