राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सकाळपासून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई ईडीकडून करण्यामागचे कारण नेमकं काय? कोणत्या आरोपांखील नवाब मलिकांची चौकशी सुरूये? जाणून घ्या…
‘या’ आरोपांखाली नवाब मलिक ईडीच्या रडारवर
- 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
- कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
- 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
- मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
- 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25रु. स्वेअर फुटांनी केली.
- जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.
(हेही वाचा – मलिकांचं दाऊद कनेक्शन? ईडीने घेतलं ताब्यात अन्…)
मलिकांच्या चौकशीचा राष्ट्रवादीकडून निषेध
दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून नवाब मलिकांची कसून चौकशी सुरू आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन होत आहे, ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी व घोषणाबाजी देखील केली. यावेळी कोणीही पदाधिकारी किंवा बडे नेते उपस्थित नव्हते. ईडीच्या ताब्यात असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. नवाब मलिक यांची चौकशी ज्यासाठी ईडीने सुरु केली आहे, ते प्रकरण दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने याआधीच ताब्यात घेतले.
Join Our WhatsApp Community