नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी करण्यात आली आहे. मात्र नवाब मलिकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. दरम्यान नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला ईडीकडून अटक करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community