कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत जमीन खरेदी व्यवहार केल्याप्रकरणी राज्याते अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी व विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर २ मार्च रोजी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
दिलासा नाहीच
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करत, मलिक यांनी आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र मलिकांची तातडीने सुटका होणार नाही. नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता नवाब मलिकांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community