‘त्या’ पार्टीचे अस्लम शेख यांनाही निमंत्रण, तरीही ते गप्प का?

ड्रग्ज पार्टीवरून इतकं मोठं महाभारत घडलं तरीदेखील पालक मंत्री अस्लम शेख आतापर्यंत गप्प का राहिले, असा सवाल उपस्थितीत

गेल्या काही महिन्यांपासून ज्या कॉर्डिलिया क्रूजवरील पार्टीने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर आता यामध्ये मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांना देखील या पार्टीचे निमंत्रण असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. या पार्टीवरून इतकं मोठं महाभारत घडलं तरीदेखील पालक मंत्री अस्लम शेख आतापर्यंत गप्प का राहिले असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण हा प्रचंड मोठा कट असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला. ‘क्रूझ पार्टीत सहभागी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनाही आग्रह करण्यात आला होता. ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा हा डाव होता,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला.

असं म्हणाले मलिक

कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत सेलिब्रिटी आणि मंत्र्यांचा मुलांना अडकवण्याचा कट काशिफ खान याने आखला होता. या पार्टीला येण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही गळ घालण्यात आली होती. मात्र, अस्लम शेख या पार्टीला गेले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.

अस्लम शेख नेमकं काय बोलणार?

दरम्यान नवाब मलिक यांनी अस्लम शेख यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर आता असलम शेख देखील उद्या बोलणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे असलम शेख उद्या नेमकं काय बोलणार हे पाहणं तितकेच महत्त्वाचे आहे.

(हेही वाचा- “पालिकेमध्ये वीरप्पन गॅंग सक्रिय”, मनसे करणार पर्दाफाश)

क्रुझ पार्टीत काशिफ खानही उपस्थित होता. नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड आहे. काशिफ खान हा त्याचा मालक आहे. नमास्क्रेच्या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतलं जातं असं सांगितलं जाते. या केसमध्ये हे सँपल स्टॉक सीझ केलं तर त्याच्या मालकाला का अटक केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशातील अनेक पोलीस ठाण्यात काशिफ खानविरोधात गुन्हे दाखल आहेत. दिल्ली कोर्टाने फरार घोषित केले आहे. तो समीर वानखेडेचा साथीदार आहे. गोव्यात काशिफ खानची खूप संपत्ती आहे. आपण फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचे तो सर्वांना सांगतो. तो पार्टीत नाचत होता. एनसीबीने त्याला अटक का केली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here