राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ४ दिवसांची न्यायालयाने वाढ केली असून, मलिक यांना आता ७ मार्च पर्यंत ईडी कोठडीत राहावे लागणार आहे. अंडरवर्ल्ड कनेक्शन, तसेच दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहारासंबधी काही पुरावे ईडीच्या हाती लागले असून, त्या संदर्भात चौकशी करायची असल्याचे सांगत, ईडीने ६ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ६ दिवस ऐवजी ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
अधिवेशन स्थगित
नवाब मलिक यांच्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने गदारोळ माजवल्याने, अधिवेशनाचे कामकाज शुक्रवारी सकाळपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. भाजप नवाबांच्या राजीनाम्याविषयी आक्रमक असल्याने, विधीमंडळाच्या पाय-यांवर भाजपकडून नवाबांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
( हेही वाचा: भारतीयांचे मदत आणि पुनर्वसन करणारी योजना सुरु राहणार! )