महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ हा दिवस फार मोठ्या घडामोडींमुळे महत्वाचा ठरला. रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच बुधवार ५ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने आपल्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. एकूण ५३ आमदारांपैकी ज्या गटात सर्वाधिक आमदार असतील, तोच गट आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा घटनात्मक अधिकार सांगू शकेल. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणाची अशी चर्चा रंगू लागली आहे.
अशातच अजित पवार यांच्या गटाकडून बोलतांना छगन भुजबळ यांनी या बैठकीत शरद पवार आमच्यासाठी श्रद्धास्थानी असल्याचे म्हंटले.
(हेही वाचा – राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्याने खातेवाटपावरुन निर्माण झाला तिढा?)
नक्की काय म्हणाले छगन भुजबळ?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचा दावा करत असतांना अचानक छगन भुजबळ यांनी “आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला. शरद पवार यांच्या निकटवर्तींयामध्ये सध्या बिनकामांच्या बडव्यांची गर्दी असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचंही ते म्हणाले. पुढे बोलतांना त्यांनी, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात राजकीय पक्षांमध्ये फूट तेव्हा फुटीर गट हाच आरोप करत आला आहे, हे इथे उल्लेखनीय आहे. शिवसेनेतून नारायण राणे किंवा राज ठाकरे यांनी फारकत घेतली तेव्हाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला गेला. शिवसेनाप्रमुख हे दैवत असल्याचं सर्वच नेते स्पष्ट करत होते. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटातील नेत्यांनीही शरद पवार या पक्षाच्या विठ्ठलाच्या भोवती बडव्यांचा गराडा पडल्याचा आरोप केला.
वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आतापर्यंत ३२ आमदारांनी उपस्थिती लावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community