मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणा-या सभेची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. राज ठाकरे हे शनिवारी औरंगाबादसाठी रवाना झाले आहेत. पण या सभेपूर्वीच राज ठाकरे यांच्यावर राजकीय स्तरांतून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता पवारांनी पुन्हा एकदा उत्तर दिले आहे.
काय म्हणाले पवार?
एका पक्षाच्या नेत्याने मध्यंतरी माझ्यावर टीका केली. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्याशिवाय शरद पवार कोणाचंही नाव घेत नाहीत, अशी टीका त्यांनी माझ्यावर टीका केली. यांची नावं नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची, असा सवाल यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांना केला आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात)
राज ठाकरेंवर टीका
ज्या महात्मा फुलेंनी देशाचा शेवटचा माणूस संघटीत होईल, शिक्षित होईल, आधुनिकतेचा पाईक होईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. ज्यांच्या पत्नीने स्त्री शिक्षणाचे दरवाजे आमच्या भगिनींसाठी खुले केले. ज्ञान, विज्ञान याचा प्रचार केला, त्याचं महत्व लोकांना पटवून दिलं, अशा व्यक्तींची नावं घ्यायची नाहीत तर मग कोणाची घ्यायची, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
(हेही वाचाः आता माझा पक्षाशी संबंध नाही, शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरेंना असं का सांगितलं?)
Join Our WhatsApp Community