मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकीकडे भाजपाने जागा राखली असताना दुसरीकडे मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विरोधकांनी याच मुद्यावरुन सत्ताधारी भाजपाला घेरले. यातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
देशात बदलाचे वारे वाहण्याचे संकेत
या निवडणुकीवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. तीन राज्यांच्या निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक, या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत. केरळ, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा नाही. कर्नाटकात आमदार फोडून भाजपाने सत्ता मिळवली आगामी काळात मतदान करताना लोक याचा नक्कीच विचार करतील, असे शरद पवार शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
( हेही वाचा: ‘सगळे साम्राज्य उद्ध्वस्त झाले त्याचे मूळ कारण संजय राऊत’; सत्तारांचा आरोप )
हा बदल आहे. आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरुन तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मते मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मते मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतो आहे याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत, हे स्पष्ट होते आहे, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community