आगामी निवडणुकांना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार, वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झालेली नाही- शरद पवार

118

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आगामी निवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत, मात्र वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झालेली नाही, आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत असे शरद पवार म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले

तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रश्न केला असता पवार म्हणाले पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेली आहेत तो प्रश्न आता कशाला काढायचा असे उत्तर पवारांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.