राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. त्या दिवसापासून शरद पवारांवर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. शरद पवारांना २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र पूर्णपणे बरे वाटत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला नव्हता. दरम्यान, पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम याकाळात रद्द करण्यात आले होते. मात्र आज, सोमवारी शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
(हेही वाचा – एलॉन मस्क यांची ब्लू टिक संदर्भात नवी घोषणा; म्हणाले, “प्रत्येक अकाऊंट…”)
सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी माहिती दिली आहे. गेल्या ८ दिवसांपासून पवारांनी शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डीमध्ये उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान, शरद पवारांनी शिर्डी येथे पक्षाच्या शिबिराला हजेरी लावली होती. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अवघ्या ३ मिनिटांचे भाषण केले होते. यावेळी शरद पवारांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले होते. तर चेहऱ्यावर देखील आजारपणामुळे थकवा दिसून येत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना 30 मार्च रोजी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे निर्माण झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचे निदान झाले होते. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community