नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप यांचे सरकार स्थापन होणार आहे, त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, तरीही या सरकारला ७ आमदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. मात्र यामागील कारण एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले शरद पवार?
आमचा पाठिंबा भाजपाला नसून तेथील मुख्यमंत्र्यांना आहे. त्या राज्यातील एकूण चित्र पाहिल्यानंतर एक प्रकारचे स्थैर्य येण्यास जर तेथील मुख्यमंत्र्यांना आमची मदत होत असेल तर हा आमचा एकत्रित निर्णय आहे. यामध्ये भाजपा नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. मेघालय आणि शेजारच्या राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गेले होते. प्रधानमंत्र्यांनी मेघालयाच्या प्रचारात तेथील मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा पराभव करा, असे आवाहन केले होते, आता निवडणूक झाल्यानंतर सत्तेत सहभागी झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या सहकाऱ्यांना घेतले आहे. आम्ही अशी भूमिका घेतलेली नाही, असा टोलाही शरद पवारांनी यावेळी लगावला.
Join Our WhatsApp Community