-
प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) यांच्यातील तणाव नव्या उंचीवर पोहोचला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी त्यांना कडव्या शब्दांत प्रत्युत्तर दिले.
अँड. अमोल मातेले यांनी विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल करत, “शरद पवारांवर टीका करण्याएवढी तुमची लायकी नाही,” असे स्पष्ट शब्दांत सुनावले. “विश्वासघाताचा गळा काढणारे तुम्हीच, कारण २०१९ मध्ये जनतेने दिलेला कौल फाडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तुम्ही सत्ता स्थापन केली,” असा पलटवार करत मातेले यांनी शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) घरचा अहेर दिला.
(हेही वाचा – पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात उंदरांचा उपद्रव; Dr. Neelam Gorhe यांनी घेतली घटनेची दखल)
संपर्क, संवाद आणि सर्वसमावेशक राजकारण ही शरद पवार यांची ओळख असून, दिलेला पुरस्कार हा केवळ कार्याचा सन्मान आहे, त्याला राजकीय रंग देऊ नका, असा थेट इशाराही त्यांनी दिला. संजय राऊत, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत हे फक्त पवार यांचे नाव घेऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राष्ट्रवादीने केला.
“महाराष्ट्राला आरोप-प्रत्यारोप नव्हे, तर विकास हवा आहे,” असा टोला लगावत, पवार गटाने शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. “रोज शरद पवारांवर टीका केली की राजकीय भविष्य उज्ज्वल होत नाही, ते कामाने घडते,” असा मार्मिक चिमटा काढत पवार गटाने या वादात शेवटचे शब्द टाकले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community