राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती थोडी बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. शरद पवारांवर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. शरद पवारांना २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यांना रूग्णालयातून अद्याप डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.
(हेही वाचा – ट्विटरच्या ३७०० कर्मचाऱ्यांना बसणार झटका! काय आहे इलॉन मस्क यांची नवा योजना?)
शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी २ दिवस लागतील अशी सध्याची मोठी अपडेट आहे. उद्यापासून राष्ट्रवादीचे शिबिर सुरू होणार आहे. या शिबिराला शरद पवार मार्गदर्शन करणार होते. मात्र अजूनही त्यांना २ दिवस तरी पूर्णपणे बरे होण्यासाठी लागतील, त्यामुळे त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांचे २ नोव्हेंबरपर्यंतचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तर ३ नोव्हेंबरपासून सर्व कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र रूग्णालयातील शरद पवारांचा मुक्काम आणखी १ ते २ दिवसांसाठी वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community