लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असतात. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची निवड केली जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी, सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप इत्यादी घडामोडी अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच एक नवीन घडामोड आता घडली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी मंगळवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील, अशी लढत आता बघायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील, अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Elections : काँग्रेसला महिला द्वेष अडचणीत आणणार )
शिवसेना शिंदे गट का सोडला?
महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चा झाली, त्यावेळी अजित पवार यांना या जागेवर दावा सांगितला, तर दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी त्यांची मागणी होती, पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवाजी आढळराव पाटील यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनुमती दर्शवली. याआधी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आढळराव पाटील यांना पाठिंबा दर्शवला. अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात शिवाजी अढळराव पाटील प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. ती अखेर खरी ठरली.
हेही पहा –