गोव्यात कॉंग्रेसने अखेर सेना-राष्ट्रवादीला नाकारलेच..!

120

गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत युती करून भाजपला धोबीपछाड करण्याचा मानस बाळगणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीला अखेर कॉंग्रेसने दूर केल्यामुळे गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे महाराष्ट्रात तयार झालेल्या महाविकास आघाडीत गोव्यात मात्र फूट पडणार आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव कॉंग्रेसने नाकारत गोव्यात स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे.

( हेही वाचा : सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांचे निकाल कळवा! )

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्रपणे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी, 19 जानेवारी रोजी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड प्रामुख्याने उपस्थित होते.

( हेही वाचा : नाना पटोलेंना मनोरुग्णालयात दाखल करा! भाजपाची मागणी )

कॉंग्रेसच्या हट्टापायी हा प्रयोग होऊ शकला नाही 

पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात एकत्रपणे निवडणूक लढणार आहेत. दोन्ही पक्ष येत्या दोन दिवसात आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील. महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे काँग्रेस पक्षात सहभागी असल्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, मात्र गोव्यात काँग्रेसने अडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागत आहे. आमची लढाई ही लोकशाही पद्धतीने असणार आहे. आम्ही गोव्यात कोणता पक्ष आमच्या समोर आहे हे पाहणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची होती मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युती हवी होती. कॉंग्रेसच्या हट्टापायी हा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.