शिवसेनेचे ५६ आणि आपले ५४ होते. याआधारे अडीच नाही, तर किमान 2 वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असता त्यावेळी तोंड उघडण्यास ते तयार नव्हते. (NCP-Shivsena) त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतदेखील उपस्थित होते. मात्र, कुणीही बोलले नाही. राष्ट्रवादीला अनेक वेळा संधी आली. मात्र, प्रत्येक वेळी आपण गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले आणि आपल्याला ठराविक जागा दिल्या. प्रत्येक वेळी आम्ही माघार घ्यायची का, पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का’, असे प्रश्न प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पहिला संकल्प मेळावा शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. याद्वारे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका मांडली. ‘भाजपकडून पूर्ण न्याय मिळणार आहे. यापुढे आपला पक्ष अधिक बळकट करू’ असे पटेल यांनी सांगितले.
(हेही वाचा – Parivartan Yatra : हिशोब घेऊन आलो आहे; अमित शहा यांचे गेहलोत यांना प्रत्युत्तर)
ज्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) भाजपशी काडीमोड घेतला, तीच मागणी आम्ही केली असता उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते मौन होते. ४३ आमदारांचे लाभलेले बळ, पक्षाची मान्यता व चिन्ह अबाधित राहील, अशी ग्वाही देत मनातील किंतू-परंतु दूर करा, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. (NCP-Shivsena)
लोगोवरून मतभेद, ऐक्य कसे होणार ?
‘ज्यांच्यामध्ये साधा लोगो ठरविण्याबाबत एकमत होऊ शकत नाही, संयोजक ठरवता येत नाही, १३ जणांची समिती करावी लागते, शक्य असेल तिथे एकच उमेदवार उभा करू, अशी शक्य-अशक्यची भाषा बोलावी लागते त्या ‘इंडिया’मध्ये ऐक्य कसे होणार, ते एकत्र कसे लढणार’, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चढवला.
२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला म्हणून भाजपसोबत असलेली नैसर्गिक युती तोडली होती. तसेच प्रत्येक व्यासपीठावरून भाजपवर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादीने तोच प्रस्ताव ठेवल्यावर शिवसेनेने बाळगलेले मौन हा आता चर्चेचा विषय झाला आहे. (NCP-Shivsena)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community