-
खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नेते जयंत पाटील (Jayant Patil) पक्षात नाराज असून ते कधीही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र, पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की भाजपामध्ये? याबाबत अद्याप संभ्रम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एकीकडे जुने सहकारी तर दुसरीकडे देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष, अशा कात्रीत पाटील असल्याचे बोलले जात आहे.
अनेक तर्क-वितर्क
गेले काही दिवसांपासून जयंत पाटील पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू असतानाच त्यांनी एका कार्यक्रमात ‘माझं काही खरं नाही,’ असे वक्तव्य करून चर्चाना बळ दिले. शनिवारी २२ मार्च २०२५ या दिवशी तर पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेट घेऊन जवळपास २५-३० मिनिटे चर्चा केली. यावरूनही अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
(हेही वाचा – Aurangzeb याची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल)
… तरी ‘बॉस’ हे देवेंद्र फडणवीसच
शरद पवार यांचा पक्ष सोडला तर पाटील कोणत्या पक्षात जातील यावरून विधीमंडळात कुजबूज सुरू झाली आहे. ३ मार्चला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. त्यामुळे राज्य पातळीवरील बहुतांश नेते एकत्र येताना दिसतात. अनौपचारिक गप्पा मारताना एका नेत्याने सांगितले की पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी त्यांचे ‘बॉस’ हे देवेंद्र फडणवीसच असतील तर जयंत पाटील थेट भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचार का नाही करणार?
मंत्रिमंडळात दोन जागा रिक्त
राज्य मंत्रिमंडळात दोन जागा रिक्त असून एक जागा राष्ट्रवादीची आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मस्साजोगचे (बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय चिघळला आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली. अखेर मुंडे यांना राजीनामा घ्यावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची एक जागा रिक्त झाली. तसेच भाजपाने एक जागा आधीच रिक्त ठेवली होती. त्यामुळे सध्या मंत्रिमंडळात दोन जागा रिक्त असल्याने पाटील कोणाच्या कोट्यातून मंत्रिमंडळात येणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community