Assembly Session : जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत संजय राऊत यांची ‘विश्वप्रवक्ते’ म्हणत उडवली खिल्ली!

218
Assembly Session : जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत संजय राऊत यांची 'विश्वप्रवक्ते' म्हणत उडवली खिल्ली!
  • खास प्रतिनिधी 

महाविकास आघाडीत फूट पडल्याचे आजही विधानसभेत स्पष्ट दिसले. सोमवारी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठाने कामकाजावर बहिष्कार घातला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांना विश्वप्रवक्ते म्हणून खिल्ली उडवली. (Assembly Session)

आव्हाडांनी केली नार्वेकरांची स्तुती

सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडला. त्याला समर्थन देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली मते व्यक्त केली. आव्हाड यांनी नार्वेकर यांची त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची स्तुती केली. (Assembly Session)

(हेही वाचा – २१ डिसेंबर World Meditation Day म्हणून घोषित)

पुढची पाच वर्षे तुम्ही कसे काढणार

आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिंदे यांनी केलेल्या भाषणावर टिप्पणी करत आव्हाड म्हणाले की अध्यक्षांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावर भाषण न करता इतर इतिहासच मागे-पुढे येत होता, असे आव्हाड म्हणाले. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी, “पुढची पाच वर्षे तुम्ही कसे काढणार?” असा प्रश्न केला. त्याला हसत हसतच आव्हाड यांनी एका वाक्यात उत्तर दिले आणि शिरसाट तसेच शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांची खिल्ली उडवली. (Assembly Session)

‘हे विश्वप्रवक्त्यांच्या खालीच’

शिरसाट यांना टोला लगावत ‘हे विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहेत’ असे शिरसाट यांना उद्देशून म्हटले. काँग्रेसपासून ते भाजपापर्यंत विविध पक्षांचे राजकीय नेते राऊत यांना ‘विश्वप्रवक्ते’ म्हणून डिवचतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या या टिप्पणीनंतर सभागृहात हा चेष्टेचा विषय झाला. (Assembly Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.