-
खास प्रतिनिधी
एरव्ही मुसलमानांची तळी उचलणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना महाराणी ताराराणींच्या शौर्याची आठवण झाली आणि त्यांनी ताराराणीच्या स्मारकाबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारला. मात्र, सर्वसामान्य लोकांनी त्यांचीच शाळा घेतली आणि तुम्ही सत्तेत असताना हे स्मारक का उभारले नाही? असा उलटप्रश्न करून त्यांची बोलती बंद केली.
महाराणी ताराराणी यांची समाधी
जितेंद्र आव्हाड यांनी X या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “ज्यांच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाहीत; त्यामधील एक महत्वाचे नाव म्हणजे महाराणी ताराराणी! मी खाली फोटो टाकले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराणी ताराराणी यांची समाधी काय अवस्थेत आहे, हे आपण पहावे. महाराष्ट्र सरकार इथे – तिथे स्मारके उभे करू लागले आहेत. तेच सरकार महाराणी ताराराणींचे स्मारक उभारतील का, प्रश्न एवढाच आहे.” असे म्हणत छत्रपती ताराबाई यांच्या समाधीचे काही फोटो टाकले.
या पोस्टवर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील बहुतेकांनी आव्हाड सत्तेत असताना स्मारक का नाही उभारले, असा सवाल केला.
(हेही वाचा – CM Medical Assistance Cell च्या मदतीने चिमुकल्याच्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; आई म्हणाली, आमच्यासाठी…)
ज्यांच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाहीत; त्यामधील एक महत्वाचे नाव म्हणजे महाराणी ताराराणी!
मी खाली फोटो टाकले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराणी ताराराणी यांची समाधी काय अवस्थेत आहे, हे आपण पहावे. महाराष्ट्र सरकार इथे -… pic.twitter.com/VcPd6j6jUV— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2025
जीर्णोद्धार नक्कीचं होणार
एकाने तर म्हटले की, “स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षे देशावर, राज्यावर कांग्रेसची एकहाती सत्ता होती. मोगल संस्कृतीचे जतन संवर्धन करणार्यांनीचं या महान राष्ट्रभक्तांच्या स्मारकांची ही अवस्था केली. आता भाजपा सत्तेवर आहे म्हणजे या उपेक्षित स्मारकांचा जीर्णोद्धार नक्कीचं होणार. जनतेला ही विश्वास आहे.”
वडिलांना विचारतील का?
तर दुसऱ्याने, “हे सर्व फोटो ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सलग ५० वर्षांपेक्षा अधिक काळ अतिमहत्वाची पदे भूषवली, त्यांना पाठवून जाब विचारा की ? त्या @supriya_sule मॅडम देखील सत्तेत नसताना असेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण “असं का ?” हा प्रश्न स्वतःच्या वडिलांना विचारत असतील का ?” असा खोचक प्रश्न केला.
(हेही वाचा – Asian Wrestling Championship : आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रीको – रोमन प्रकारात नितेशला कांस्य)
काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे जशाच्या तशा :
हा रेडा विरोधात गेला की याला हिंदुत्ववादी योद्धे आठवतात, आणि जेंव्हा सरकारमध्ये असतो तेंव्हा कबरिसाठी जमीन देतो मशिदी बांधून देतो अवैधपणे जमीन बळकावून बांधलेल्या मजारीना सरंक्षण देतो आणि 80 वर्षाच्या योध्याची चाटतो
हे तुम्हाला विरोधी पक्षात बसल्यावरच कळलं का??
इतके दिवस सत्तेत असताना तुम्हाला आणि तुमच्या साहेबांना हे दिसलं नाही का??
अर्थात, ही बाब निदर्शनास आलीच आहे तर तिथे योग्य स्मारक उभारले जाईल ही याच सरकारकडून अपेक्षा आहे.
१९९९ ते २०१४ तुमचं सरकार होत त्या वेळेला तुम्ही किती वेळेला हा प्रश्न विचारला होता?
मा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेंव्हा काय केले ?
तुम्ही आमदार आहात… खासदार आहात… तुमच्या कडे पैसा आहे… पत आहे… तुम्ही का नाही.. स्वतः ऊभी करत… तुमच्या थर्ड क्लास राजकारणाचा विट आला आहे… बस करा आता…
तुमच्या व बॉस कड़े भरपूर पैसा आहे, आता तुमचे हृदय भरुन आले तर तुम्हींच डगडुगी करून टाका
मुळातच राजकारण्यांनी ह्या विषयावर न बोललेच बर
सत्तेत असताना झोपा काढा . विरोध आलात कि आठवण .
तुम्हीच सगळेच राजकरणी एकाच टोकरीतले— CLICK_मराठी 🚩 (@GoMHA7761) March 28, 2025
मा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेंव्हा काय केले ?
— Yeshwant M Puranik ❤️Bharat (@YeshwantMPuran1) March 27, 2025
मा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेंव्हा काय केले ?
— Yeshwant M Puranik ❤️Bharat (@YeshwantMPuran1) March 27, 2025
हेही पहा –
Join Our WhatsApp Community