राष्ट्रवादी म्हणते, ‘…म्हणून भाजपला न्युमोनिया झाला’

140

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मात्र आता त्यांच्या या टीकासत्राला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे.

2019च्या निवडणुकीआधी शरद पवार साता-यातील प्रचारात पावसात भिजले होते. यावरुन पडळकरांनी शुक्रवारी त्यांच्यावर टीका केली. याच टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी झणझणीत प्रत्त्युत्तर दिले आहे.

(हेही वाचाः भाजप, महाविकास आघाडीची बेरीज-वजाबाकी; किती येणार, किती जाणार?)

पडळकरांना टोला

पावसात भिजूनही 2019च्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 54 च्या वर जागा मिळवता आल्या नाहीत. ती संख्या कायम ठेवण्यासाठी आता त्यांना वारंवार घाबरु नका, काळजी करू नका, असं सांगावं लागत आहे, अशी टीका पडळकर यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सणसणीत प्रतिहल्ला चढवला आहे. शरद पवार पावसात भिजले पण त्यामुळे न्युमोनिया मात्र भाजपला झाला, असा टोला त्यांनी पडळकर यांना लगावला आहे.

प्रसिद्धीसाठी पडळकरांची धडपड

गोपीचंद पडळकर हे उठसूट शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य करत असतात. पवारांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, हे पडळकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते दररोज राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांवर टीका करत असतात. पवारांचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवण्याची पडळकरांची धडपड सुरू असते, अशी टीका तपासे यांनी केली आहे. भाजपला राज्यात सत्ता टिकवता आली नाही, हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

(हेही वाचाः सुप्रिया ताईंचा आनंदच न्यारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.