ठाकरे सरकार टिकवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करणार – अजित पवार

181
सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे, त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे आमदार आणि खासदार यांची बैठक झाली. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे सरकार शेवटपर्यंत टिकवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहे, सहकार्य करणार आहे, अशी भूमिका ठरवण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

निधी वाटपावर कधी दुजाभाव केला नाही  

अडीच वर्षांपूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा ३६ पालकमंत्री नियुक्त केले, त्यात तिन्ही पक्षांचे सामान पालकमंत्री नेमले, त्यानुसार निधी वाटप करण्यात येत आहे. मी कधी दुजाभाव केला नाही. विकासकामांना सहकार्य करायचे हेच माझे धोरण होते. मात्र जर निधी बंडखोर आमदारांच्या निधी वाटपावरून काही तक्रारी होत्या, तर त्याविषयी त्यांनी जर एकत्र बसून चर्चा केली असती, तर त्यावर समज गैरसमज दूर केले असते. विकासकामांसाठीचा निधी मी थांबवू शकत नाही, तो त्यांच्या त्यांच्या खात्याला दिल्यावर तो कसा वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे नुकसान होत आहे आणि दोन्ही काँग्रेस वाढत आहे, असे जर बंडखोर आमदारांचे म्हणणे होते तर त्यांनी तसे त्यांच्या पक्षाच्या बैठकीत किव्हा महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगायला पाहिजे होते, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.