Ajit Pawar : अजित पवारांचा हट्ट होणार पूर्ण? राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

153

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्याध्यक्ष पदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली, त्यामुळे अजित पवार यांच्यात अस्वस्थता पसरली होती. त्यांना विरोधी पक्ष नेते पद सोडून प्रदेशाध्यक्ष देण्यात यावे, असा हट्ट धरला आहे. त्यामुळे रविवारी, २ जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले, अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असे म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष देवगिरीवर दाखल झाले. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ देखील अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल  झाले आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील दाखल झाले.

(हेही वाचा आदित्य ठाकरे भडकले : महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या फाईल्स तयार केल्या, सत्ता आल्यानंतर सर्व लुटारुंना आत टाकणारच)

सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राजघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु झाली आहे. प्रश्न इतकाच आहे की जर प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांना मिळालं तर विरोधी पक्षनेते पदाचं आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचं काय?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.