भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विट केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘जेल भरो’ आंदोलन केले. पण यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानातून पोलीस व्हॅनमध्ये बसवून यलो गेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश राणेंवर कठोर कारवाईची मागणी केली.
निलेश राणेंविरोधात शुक्रवारी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, युवक व महिला यांच्यातर्फे मुंबई ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. पण यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, ओबीसी कार्याध्यक्ष राज राजापूरकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रशांत पाटील, आरती साळवी, भावना घाणेकर, प्रमोद पाटील यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली.
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी आपला भूतकाळ आठवा; भाजप खासदाराच्या पत्रात काँग्रेसचे ‘पोस्टमार्टम’)
मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मासंबंधित शरद पवारांनी केलेल्या विधानाविषयी निलेश राणे यांनी ट्वीट करत एका वृत्तवाहिनीच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. ट्वीटमध्ये निलेश राणे यांनी लिहिले होते की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community