औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अशोक नागे, राजू बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे,अशी आरोपींची नावे आहेत.
( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा )
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी बोकुड जळगाव येथे ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती. ज्यात भाऊसाहेब तरमळे यांच्या आई सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. यात त्याचा विजय देखील झाला. दरम्यान, याच निवडणुकीचा राग मनात ठेवून विरोधी गटातील अनिकेत नागे याने चाकूने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री हल्ला केला. भाऊसाहेब तरमळे यांच्या डोक्यावर, मानेवर गंभीर जखम झाली. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मोठा रक्तस्त्राव झाल्याने, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community