आयएफएससी कंपनी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स सोमवारी पाठवण्यात आला आहे. २२ मे रोजी प्रत्यक्ष ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना या समन्समधून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – परदेशी ब्रँडच्या २४ कोटी रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त, पाच जणांना अटक)
याआधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला दिवशी म्हणजेच ११ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याप्रकरणी समन्स बजावला होता. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. ईडीने ११ मे रोजी समन्स बजावून १५ मेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण जयंत पाटील यांनी जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मागितला होता. यासंदर्भात जयंत पाटलांनी ईडीला पत्र पाठवले होते. त्यांची हीच विनंती ईडीने मान्य करून एका आठवड्याने म्हणजे २२ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिली आहे. यासंबंधितला समन्स सोमवारी जयंत पाटलांना बजावण्यात आला आहे.
हेही पहा –