राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरच!

चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी गुरुवारी स्वीकारणार आहेत.

132

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासू्न दीड वर्षे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते, ते भरले जात नाही, त्यामुळे सरकारवर टिका होत होती. चार दिवसांपूर्वी या पदावर एनसीपीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या ट्वीटने चाकणकर आणखी चर्चेत आल्या होत्या. अखेर चाकणकर यांचीच आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी गुरुवारी स्वीकारणार आहेत.

४ फेब्रुवारी २०२० रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी भाजपा आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जात होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्य सरकारवर अनेकदा टीकास्त्र सोडले होते.

(हेही वाचा : चित्रा वाघ म्हणतात, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी शुर्पणखा बसवू नका)

चित्रा वाघ यांच्यामुळे चाकणकर आल्या चर्चेत

ज्या दिवशी रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे वृत्त आले, तेव्हा चित्रा वाघ यांनी ट्वीट करून ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’बसवू नका, अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’, असे म्हटले होते. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला. त्यावर खुलासा करताना चित्रा वाघ यांनी ‘हे मत आपण कुणाचेही नाव न घेता मांडले आहे. सध्या सरकारमध्ये बरेच रावण आहेत, त्यांना पाठिंबा देणारी व्यक्ती कुणी या पदावर बसवण्यात येऊ नये, अशी अपेक्षा आहे’, असे वाघ म्हणाल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.