भाजपामध्ये गेलेल्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान?

217

ऐन कोरोनाच्या काळतही राज्यामध्ये सध्या राजकीय हालचाली जोरदार सुरु झाल्या असून, आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेमध्ये आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे काही दिवसाआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच आता राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे.

यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी 

भाजपामध्ये गेलेल्यांना प्रवेश देण्याची महत्त्वाची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आली असून, लवकरच भाजपा आमदारांचा प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

“काही आमदार शरद पवारांना, अजित दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून याबाबत चर्चा करत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल.

नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.