NDA Govt : मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे.

138
NDA Govt : मोदींच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी, (९ जून) शपथविधी होणार आहे. सायंकाळी ७.१५ वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार ३.०च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात ७८ मंत्री असतात. रविवारी ४0 ते ४५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. (NDA Govt)

यामध्ये राज्यातील १२ जणांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओ कार्यालयातून रविवारी सकाळी नव्या मंत्राना फोन जाणार आहे. त्यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बोलवण्यात येणार असून त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. मंत्रिपदाची नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा आणि बैठकांचे सत्र सूरू आहे. (NDA Govt)

(हेही वाचा – Video Python Swallows Woman Whole: ४ मुलांच्या आईला अजगराने गिळलं जिवंत; पोट फाडून काढला मृतदेह)

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला ४, जेडीयूला ४, लोकजनशक्ती पार्टीला २ मंत्रिपदं मिळू शकतात. तेलुगू देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचं समजतंय. मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजपा स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे. (NDA Govt)

राज्यातील कोणत्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना रविवारी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनाला चार मंत्रिपदे मिळू शकतात. राज्यातील भाजपचे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेनकडून मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. रिपाइंकडून रामदास आठवले हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.