NDA : कितीही आटापिटा करा, पंतप्रधान होणार मोदीच !

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, हे निवडणुकीच्या आकड्यांचा खेळावरून स्पष्ट झाले आहे. घटनात्मकदृष्ट्याही मोदींचा वरचष्मा आहे.

315

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, हाच भाजपा निवडणुकीच्या आधी भाजपाला स्वबळावर २७२चा आकडा पार करेल, असे सांगत होता आणि एनडीए (NDA) ४०० पार करेल असा दावा करत होता. प्रत्यक्ष निकाल लागल्यावर मात्र भाजपाच रथ २४० वर रोखला गेला, तर एनडीए मात्र २९२ पर्यंत पोहचला आहे. हा आकडा टीडीपी आणि जेडीयू या दोन पक्षांमुळे पोहचला आहे, हे दोन्ही पक्ष एनडीए मधून बाहेर पडून पुन्हा एनडीए मध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भरवसा नाही, म्हणून आता इंडी आघाडीचे पक्षही या दोन पक्षांना गृहीत धरून बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करू लागले आहे. कारण इंडी आघाडीला २४३ जागा मिळाल्या आहेत, परंतु विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी एनडीएचेच (NDA) सरकार येणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार, असे आकडे सांगत आहेत. लोकसभेत ५४३ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. जाणून घेऊया कसे असणार सत्तेचे समीकरण…

एनडीएला सरकार स्थापन करता येणार का? 

पहिली शक्यता : चंद्राबाबूंनी एनडीए सोडली तर… 

एनडीएकडे (NDA) २९२ जागा आहेत, त्यापैकी टीडीपीचा वाटा १६ आहे. टीडीपी इंडी आघाडीसोबत गेल्यास एनडीएकडे २७६ जागा राहतील. म्हणजे बहुमतापेक्षा ४ जागा जास्त. एनडीएचे सरकार स्थापन होईल. २९२ – १६ =  २७६ (एनडीएकडे बहुमतापेक्षा ४ जास्त)

दुसरी शक्यता : नितीश कुमार एनडीए सोडतील तर… 

एनडीएकडे २९२ जागा आहेत, त्यापैकी जेडीयूकडे १२ जागा आहेत. जेडीयू इंडी आघाडीतसोबत गेल्यास एनडीएकडे २८० जागा राहतील. म्हणजे बहुमतापेक्षा ८ जागा जास्त. एनडीएचे सरकार स्थापन होईल. २९२-१२=२८० (एनडीए बहुमतापेक्षा ८ जास्त)

तिसरी शक्यता : टीडीपी आणि जदयू दोघांनी एनडीए (NDA) सोडली तर… 

टीडीपीच्या १६ जागा आणि जदयूच्या १२ जागा मिळून २८ चा आकडा गाठला आहे. एनडीएच्या एकूण २९२ जागांपैकी टीडीपी आणि जदयूच्या जागा वजा केल्यास हा आकडा २६४ वर पोहोचेल. म्हणजे बहुमतापेक्षा ८ जागा कमी. अशा स्थितीत एनडीए सरकार बहुमतासाठी कमी पडेल. टीडीपी + जदयू म्हणजेच १६ + १२ = २८

आता २९२-२८ = २६४ (एनडीए (NDA) बहुमतापेक्षा ८ जागा मागे असेल, पण एनडीए ही मोठी आघाडी राहील)

(हेही वाचा Veer Savarkar: ‘हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात…’; निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर वीर सावरकर यांचं ‘ते’ वक्तव्य व्हायरल)

इंडी आघाडीच्या हाती सत्तेचे सोपान येईल का? 

पहिली शक्यता : जदयू इंडी आघाडीसोबत गेला तर… 

जेडीयूकडे १२ जागा आहेत. जर ती इंडी आघाडीसोबत जदयू गेला, तर इंडी आघाडीचा आकडा २४६ वर पोहोचेल. यानंतरही बहुमताच्या आकड्यापेक्षा २८ जागा कमी असतील. २३४+१२ = २४६ (इंडी २८ जागा बहुमतापेक्षा कमी)

दुसरी स्थिती: टीडीपी इंडी आघाडीत गेला तर… 

टीडीपीला १६ जागा मिळाल्या आहेत. जर टीडीपी इंडी आघाडीसोबत आला तर त्यांचा आकडा २५० वर पोहोचेल. यानंतरही इंडी आघाडी बहुमताच्या आकड्यासाठी २२ जागा कमी असतील.
२३४+१६ = २५० (इंडी २२ जागा बहुमतापेक्षा कमी)

तिसरी शक्यता : जदयू आणि टीडीपी इंडी आघाडीसोबत गेले, तर… 

टीडीपी आणि जेडीयूला मिळून २८ जागा आहेत. जर हे दोघेही इंडी आघाडीमध्ये सामील झाले तर हा आकडा २६२ वर पोहोचेल. यानंतरही इंडी आघाडीला बहुमतासाठी १० जागांनी कमी पडतात.

टीडीपी + जदयू म्हणजे १६+१२ = २८ आता २३४+२८ = २६२ (इंडी आघाडी बहुमतासाठी १० जागांनी मागे)

(हेही वाचा Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसे नेत्याची ठाकरेंवर सडकून टीका)

चौथी स्थिती: जदयू, टीडीपी आणि एलजीपी इंडी आघाडीसोबत गेले, तर… 

टीडीपीच्या १६ जागा, जदयूच्या १२ जागा आणि एलजीपी ५

टीडीपी+जदयू+एलजीपी म्हणजे १६+१२+५ = ३३, आता इंडी आघाडी २३४+३३ =२६७ (इंडी आघाडी बहुमतासाठी ५ जागा कमी पडतात)

पहिल्या आणि दुसऱ्या परिस्थितीत एनडीएकडे (NDA) बहुमत आहे. अशा परिस्थितीत, निवडणूकपूर्व आघाडीला बहुमत मिळाल्यास राष्ट्रपती एनडीए नेत्याला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील. आघाडीचे नेते असल्याने मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

(हेही वाचा एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारचा भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकणार; PM Narendra Modi यांची घोषणा)

तिसऱ्या स्थितीत, NDA बहुमतात मागे असला तरी, सर्वात मोठी आघाडी स्थापन करण्याच्या बाबतीत, राष्ट्रपती त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील. अशा परिस्थितीतही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना ८ जागांची आवश्यकता असेल. यावेळी कोणत्याही युतीचा भाग नसलेल्या अपक्ष आणि अनेक छोट्या पक्षांना एकूण १८ जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना किंवा उमेदवारांना एकत्र आणून मोदी बहुमताचा आकडा गोळा करू शकतात.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, हे निवडणुकीच्या आकड्यांचा खेळावरून स्पष्ट झाले आहे. घटनात्मकदृष्ट्याही मोदींचा वरचष्मा आहे. वास्तविक, परंपरेनुसार, भारताचे राष्ट्रपती सर्वात मोठ्या आघाडीला किंवा सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. या निवडणुकीत एनडीए (NDA) 292 जागांसह सर्वात मोठी आघाडी आहे आणि भाजप 240 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.