PM Narendra Modi : लोकसभेच्या मैदानात रालोआची वज्रमूठ हवी; पंतप्रधानांची महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांशी चर्चा

128

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मधील लोकसभा आणि आगामी काळातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी रालोआतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे सत्र सुरू केले आहे. मोदी यांनी काल महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांसोबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, 8 आगस्ट रोजी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजप तसेच मित्र पक्षांच्या खासदारांसोबत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा केली. यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट) गटाच्या खासदारांनी भाग घेतला. राकॉकडून राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची आगामी निवडणूक रालोआची वज्रमूठ बनवून लढण्याचा निश्चय केला आहे, असे दिसून येत आहे. भाजप आणि रालोआ खासदारांची नवीन महाराष्ट्र सदनात झालेली ही चौथी बैठक होय. यापूर्वी 31 जुलै आणि 2 आगस्ट रोजी पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील मित्र पक्षांसोबत चर्चा केली होती. यानंतर तीन ऑगस्टला ओडिशातील खासदारांसोबत चर्चा केली. आणि मंगळवार, 8 आगस्ट रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या खासदारांसोबत चर्चा केली.

(हेही वाचा लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधी आले चर्चेत; का सुरु झाला #Pappu ट्रेंड?)

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रमुख नेत्यांची एक उच्चस्तरीय बैठक अलिकडेच पार पडली होती. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित होते. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि बहुप्रतिक्षित 2024 लोकसभा निवडणुकीच्या तयारी या बैठकीचा मुख्य हेतू होय, हे येथे उल्लेखनीय.

मोदी यांनी कालच्या बैठकीत समाजातील गोरगरीब आणि मागासलेल्या घटकांच्या गरजा तसेच समस्यांकडे खास लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच प्रत्येकांनी आपल्या क्षेत्रातील समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असल्याचेही सांगितले आहे. आपल्या क्षेत्रातील गरिबांच्या समस्या काय आहेत? आणि त्या सोडविण्यासाठी काय काय करावे लागेल? गरीब आणि वंचित घटकांकडे विशेष लक्ष द्या. योजनांमध्ये गरीब-मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा. दुर्बल घटकांमध्ये जा. गरिबांना थेट फायदा होईल अशा योजना करा. प्रगतीशील आणि सर्जनशील विचार करा, आदी गोष्टींकडे कालच्या बैठकीत भर देण्यात आला असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.