एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारचा भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकणार; PM Narendra Modi यांची घोषणा

238
आज पवित्र दिवशी एनडीएचे सलग तिसऱ्यांदा सरकार बनणे निश्चित झाले आहे. आम्ही सर्वजण जनतेचे आभारी आहे. देशवासीयांनी भाजपा आणि एनडीएवर पूर्ण विश्वास ठेवला आहे. आपला हा विजय जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा विजय आहे, हा भारताच्या संविधानावरील अतूट निष्टेचा विजय आहे, हा सबका साथ सबका विकास, १४० कोटी भारतीयांचा विजय आहे. देश पुन्हा मोठ्या निर्णयाचा आध्याय लिहिणार ही मोदींची गॅरंटी आहे. भ्रष्टाचारावर सतत प्रहार केले पाहिजे, तिसऱ्या कार्यकाळात एनडीएचा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकण्यावर भर असणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपाप्रणित एनडीएचे सरकार पुन्हा देशात येणार आहे, हे अधोरेखित केले.
मी आज देशाच्या निवडणूक आयोगाचे अभिनंदन करत आहे. सुमारे १०० कोटी मतदार, ११ लाख निवडून बूथ इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणूक पार पाडली. भारताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर सर्व भारतीयांचा विश्वास आहे. यावेळीही भारतात जेवढ्या लोकांनी मतदान केले ते अनेक मोठ्या लोकशाही देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा मोठी संख्या आहे. जम्मू काश्मीरमध्येही अभूतपूर्व मतदान झाले आहे. मी देशभरातील सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो. भाजपा आणि एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे धन्यवाद करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

चार राज्यांत काँग्रेसचा सुपडासाफ 

या निकालाचे अनेक पैलू आहे. १९६२ नंतर पहिल्यांदा हे सरकार तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येत आहे. राज्यांमध्ये जिथे विधानसभेची निवडणूक झाली तिथेही एनडीएला मोठा विजय मिळाला आहे, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशासह चार राज्यांत काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. भाजपा ओडिशामध्ये सरकार बनवणार आहे. तिथे लोकसभामध्येही ओडिशाने चांगला प्रतिसाद दिला. तिथे प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री होईल. भाजपाने केरळमध्ये जागा जिंकली. तेलंगणामध्ये भाजपाची संख्या दुप्पट झाली आहे. मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल येथे अनेक राज्यांमध्ये भाजपाने सर्वांच्या सर्व जागा जिंकल्या. केंद्र सरकार तुमच्या विकासासाठी कोणतीही निर्णय घेईल. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात आणि बिहारमध्ये नितीश बाबू यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले. १० वर्षांपूर्वी देशाने परिवर्तन केले, तेव्हा देश निराशेच्या गर्तेत होता. प्रत्येक दिवशी वर्तमान पत्रात भ्रष्टाचाराचे वृत्त यायचे, तेव्हा देशाने निराशेच्या गर्तेतून आशेचा मोती शोधण्याची संधी दिली. त्यानुसार एनडीएने २०१४, २०१९ मध्ये विकासाची गॅरंटी केली, आज तिसऱ्यांदा एनडीएला जो आशीर्वाद मिळाला आहे, त्यामुळे जनता जनार्दनाच्या समोर नतमस्तक आहे. हा क्षण वैयक्तिकदृष्ट्या भारावून टाकणारा आहे , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

माता भगिनींनीं मला नवी प्रेरणा दिली

माझी आई गेल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. पण देशाने माझ्या आईची कमतरता भासवू दिली नाही. देशातील इतिहासात महिलांद्वारा मतदानाचे सगळे रिकॉर्ड तोडले. हे मी कधी विसरू शकत नाही. देशातील कोट्यवधी माता भगिनींनीं मला नवी प्रेरणा दिली. आम्ही जगातील सगळ्यात मोठी जन कल्याण योजना दिली, १२ कोटी जनतेला नळातून पाणी दिले, ४ कोटी लोकांना स्वतःचे घर दिले, कोट्यवधी गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला. देश पुन्हा मोठ्या निर्णयाचा आध्याय लिहिल, ही मोदींची गॅरंटी आहे. एनडीए सरकारची प्राथमिकता ही समाजाची सेवा आहे. आधीच्या १० वर्षांत २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.