आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात; बांगलादेशातील अंतरिम सरकारचा सल्लागार Asif Mahmud पुन्हा बरळला

153
आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात; बांगलादेशातील अंतरिम सरकारचा सल्लागार Asif Mahmud पुन्हा बरळला
आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात; बांगलादेशातील अंतरिम सरकारचा सल्लागार Asif Mahmud पुन्हा बरळला

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमध्ये त्यांच्या पक्षाच्या ४०० हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. तसेच पक्षाचा दावा आहे की, जुलैपासून कार्यकर्त्यांच्या इस्लामिक कट्टरतावादी संघटना जमात-ए-इस्लामीने हत्या केल्या. त्यातच हसीनांचे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर विद्यार्थी नेत्याने बांगलादेशातील नवे सरकार भारताच्या हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे सांगितले. (Asif Mahmud)

अवामी लीगने (Awami League) त्यांच्या पक्षाच्या ३९४ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची यादी जाहीर केली असून त्यांची हत्या झाली आहे. ही सुरुवातीची यादी असून येत्या काळात अशा आणखी याद्या जाहीर केल्या जातील, ज्यात हत्या झालेल्यांची नावे असतील, असे पक्षाचे म्हणणे आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील अराजकतेनंतर अवामी लीगच्या बहुतांश नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.

जमात-ए-इस्लामीने विरोधकांवर हल्ला करत हत्येचे नवे तंत्र अवलंबलेले आहे. जमातची विद्यार्थी संघटना छात्र शिबिर अशा हत्यांसाठी देशभरात कुप्रसिद्ध आहे. बांगलादेशात यावर्षी ५ ऑगस्ट रोजी झालेल्या सत्तापालटानंतर अवामी लीगच्या (Awami League) नेत्यांना कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या पक्षाच्या २९ नेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती.

बांगलादेशला भारताचे हिंदुत्व आवडत नाही

शेख हसीना सरकारविरोधात विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा असलेले २६ वर्षीय आसिफ महमूद (Asif Mahmud) म्हणतो की, बांगलादेशातील लोक हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. मोहम्मद युसूफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सल्लागाराची भूमिका बजावणारे आसिफ महमूद यांनी दै. भास्करशी बोलताना सांगितले की, भारतातील अनेक नेते बांगलादेशविरुद्ध द्वेष पसरवत आहेत. तसेच आमचे लोक भारतावर नाराज आहेत कारण भारत शेख हसीनाला मदत करत आहे. शेख हसीना तिथे राहत असून भाषण देत आहेत. जर भारताने त्यांना परत पाठवले तर बांगलादेशसोबतचे संबंध सुधारतील, असे ही महमूद (Asif Mahmud) म्हणाला. त्याचबरोबर बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवरील हल्ले हा राजकीय मुद्दा असल्याचे वर्णन महमूदने (Asif Mahmud) केले.

दरम्यान हिंदुत्वाबाबत आसिफ महमूद (Asif Mahmud) म्हणाले, “भाजप भारतात सरकार चालवत आहे. त्याचा जाहिरनामा हिंदूंसाठी आहे. ज्याच्या आम्ही विरोधात आहोत. बांगलादेशातील लोकांना हिंदुत्व आवडत नाही. CAA-NRC कायदा २०१९ मध्ये भारतात मंजूर झाला. आम्ही त्याला विरोध केला. भारतातून मोठ्या संख्येने स्थलांतरित बांगलादेशात परत येऊ शकतात. हे धोरण मुस्लिमांच्या विरोधात आहे. आम्हाला याचा धोका वाटतो.”, असेही महमूद (Asif Mahmud) म्हणाला.

पुढे आसिफ (Asif Mahmud) म्हणाला, “जे शेख हसीना सरकारसोबत होते त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. हेच भारतद्वेषाचे कारण आहे. त्यामुळे बांगलादेशातील लोक भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. शेख हसीना सत्तेवर आल्यानंतर अवामी लीगच्या १० हजार लोकांना तुरुंगात टाकण्यात आल्याची कबुली महमूद यांनी दिली.

‘जय बांगला’ ही राष्ट्रीय घोषणा न स्वीकारणे आणि चलनी नोटांवरून शेख मुजीबूर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांचा फोटो काढून टाकण्याच्या तयारीबाबत महमूद म्हणाले की, बांगलादेशने १९४७, १९७१ आणि १९९० मध्ये लढा दिला होता. ते म्हणाले की, कोणीही व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यात अनेक लोक सहभागी झाले होते. आमच्याकडे मौलाना हमीद खान वसानी, हुसेन सुहरावर्दी आणि जोगेन मंडल सारखे अनेक संस्थापक पिता आहेत,” असेही तो म्हणाला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.