नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात; मंत्री Radhakrishna Vikhe-Patil यांच्या सूचना

41

नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण, वन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) लवकरात लवकर मिळवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील (Water Resources Minister Vikhe Patil) यांनी दिल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. (Radhakrishna Vikhe-Patil)

जलसंपदा मंत्री विखे पाटील (Water Resources Minister Vikhe Patil) म्हणाले, राज्यातील अवर्षण प्रवण भागाला सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून शासनाने नदीजोड प्रकल्प (River Linking Project) हाती घेतला आहे. प्रकल्पाची कामे लांबल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व प्रकल्पाचा खर्चही वाढतो. त्यामुळे या प्रकल्पांची कामे विहित मुदतीत सुरू होणे आवश्यक असल्याने आवश्यक प्रक्रिया विभागाने सुरू करावी. या कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. आराखड्यानुसार कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत असेही निर्देशही विखे पाटील यांनी दिले.

(हेही वाचा – Mahakumbh बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार ; 54 सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध एफआयआर दाखल)

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबतचा आढावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सह्याद्री अतिथी गृह (Sahyadri Guest House) येथे झालेल्या या बैठकीस बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठक, प्रसाद नार्वेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.