दहशतवादाविरोधात सक्रिय, समन्वित मोहिमा राबवण्याची गरज: अमित शाह

122

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि भारत सरकार, लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, जम्मू-काश्मीर पोलीस, जम्मू-काश्मीर शासन यातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समृद्ध आणि शांततामय जम्मू आणि काश्मीरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहशतवादाविरोधात सुरक्षा दले आणि पोलिसांनी सक्रिय, समन्वित मोहिमा राबवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले. जम्मू-काश्मीर हिंसाचारमुक्त ठेवण्यात आणि कायद्याचे राज्य बहाल करण्यासाठी सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे अमित शाह यांनी कौतुक केले.

स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान ‘हरघर तिरंगा’ मोहिमेमध्ये अभूतपूर्व उत्साहाचा नवा स्तर पाहायला मिळाला. दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांबाबतच्या भयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा जाळे अधिक बळकट करण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. त्यांनी सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि दहशवादाच्या घटना कमी व्हाव्यात तसेच फुटीरतावादी जाळ्यांचा व्यवस्थेवरील प्रभाव संपुष्टात यावा यासंबंधी मागील बैठकांमधील सुरक्षा अजेंडाच्या विविध बाबींवर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

( हेही वाचा: दीक्षाभूमीला मिळणार ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; फडणवीस यांचे आश्वासन )

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दले आणि पोलिसांनी कुशल आणि सुनियोजित मोहिमांच्या माध्यमातून समन्वित प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला आणि तपास वेळेवर आणि परिणामकारक असावा यावर भर देण्यात आला. सुयोग्य तपास सुनिश्चित करण्यासाठी संबंधित संस्थांनी क्षमता सुधारण्यासाठी काम करावे, दहशतवादी-फुटीरतावादी मोहिमेला मदत आणि प्रोत्साहन देणाऱ्या घटकांचा समावेश असलेली दहशतवादी परिसंस्था, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी पूर्णपणे नष्ट करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.