महिला सशक्तीकरण गरजेचे; समाजाला संघटित करणे हेच संघाचे ध्येय – डॉ. मोहन भागवत

126

विजयादशमीनिमित्त नागपूरमधील रेशीमबाग येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वसंसेवकांना संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मुख्यालयात ध्वजारोहण आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

( हेही वाचा : “जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार, भेदभाव सोनं लुटूया हिंदुत्वाच्या विचारांचं…” दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सूचक ट्वीट)

पुरूष व महिला दोघेही परस्परपूरक

शांततेला शक्तीचा आधार आहे. शुभ कार्याला शक्ती हवी अनेक कर्तृत्वान महिला संघाच्या मंचावर अतिथी म्हणून याआधीही आल्या होत्या. संपूर्ण समाजाला संघटित करणे हे संघाचे ध्येय आहे. समाज महिला व पुरूष दोघांनीही बनतो. पुरूष व महिला यांच्यात कोण श्रेष्ठ हा विचार आम्ही करत नाही दोघेही परस्परपूरक आहेत असे सरसंघचालक म्हणाले.

भारताचे वजन वाढतेय

श्रीलंका आणि युक्रेनला मदत केल्यामुळे आपल्या देशाचे वजन वाढले आहे. राष्ट्रीय सुरक्षेमध्येही आपण उत्तरोत्तर यशस्वी आणि स्वावलंबी होत आहे. कोरोना संकटानंतर आपली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. क्रीडा क्षेत्रातही चांगले बदल झालेत आपले खेळाडू देशाचे नाव शिखरावर नेत असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.

मातृभूमीच्या वैभवासाठी कटीबद्ध व्हा

“राष्ट्राच्या इतिहासात अशी एक वेळ येते, जेव्हा नियती राष्ट्रासमोर एक उद्दिष्ट, एक काम उभे करते. अन्य कोणत्याही कामाचा यापुढे त्याग करावा लागतो. ते कितीही उदात्त असले, तरी नियतीने सोपविलेल्या कामापुढे ते गौणच असते. आज आपल्या मातृभूमीच्या सेवेची अशी वेळ आली आहे, जिच्यापुढे अन्य कोणतेही काम महत्वाचे नाही. तुम्ही शिकत असाल, तर मातृभूमीसाठीच शिका, शरीर मन आणि आत्म्यास या कर्तव्याकरिता सक्षम बनविण्याकरिता प्रशिक्षित करा, आणि आपले जीवन मातृभूमीसाठीच आहे, याची जाणीव ठेवा. साता समुद्रापार विदेशात शिक्षणासाठी गेलात, तर या शिक्षणाचा उपयोग मातृभूमीच्या सेवेसाठी करता येईल असे शिक्षण घ्या, मातृभूमीच्या वैभवासाठी कटिबद्ध व्हा, इतरांची दुःखे झेलून मातृभूमीला आनंदी ठेवा.” असे आवाहन सरसंघचालकांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.