Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी केली ‘वेगळ्या खान्देश’ची मागणी

विकासच जर थांबला असेल आणि सातत्याने खान्देशवर अन्याय होत असेल तर मग कुणाकडे बघावं, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

163
Lok Sabha Election 2024 : खडसेंच्या भाजपा एन्ट्रीमध्ये ओबीसी कार्डचे गणित

ऑक्टोबर २०२० साली भाजपा पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठी मागणी केली आहे. ‘खान्देश’ जिल्ह्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भ वेगळा देण्याची मागणी सुरु असून त्यामध्ये आता खान्देशचाही समावेश झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खान्देशातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने खडसे (Eknath Khadse) यांनी ही मागणी केली आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar : महाविकास आघाडीत शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार? काय म्हणाले शरद पवार?)

जळगावातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. खान्देशात कोणतेही प्रकल्प होत नाही, त्यामुळे विकास रखडला आहे आणि त्यामुळे इच्छा नसतानाही खान्देश महाराष्ट्रापासून वेगळा करावा, असं म्हणावं लागत आहे असेही खडसे यावेळी म्हणाले.

एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) मतदारसंघातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रापाठोपाठ, आता पशु वैद्यकीय महाविद्यालय देखील शासनाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे. मात्र जिल्ह्यातील मंत्री निमूटपणे त्याकडे पाहत आहेत, मी एकटाच बोलतो पण सरकारकडून कुठलीही कारवाई होत नसल्याची खंत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

हेही पहा –

विकासच जर थांबला असेल आणि सातत्याने खान्देशवर अन्याय होत असेल तर मग कुणाकडे बघावं, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत असणाऱ्या गिरीश महाजन (Girish Mahajan) असतील किंवा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) असतील, त्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी आणि जळगावच्या विकासाचे प्रकल्प पुन्हा खान्देशात णावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.