हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला नीलम ताईंचे चोख प्रत्त्युत्तर

शिवसेनेने आपली राजकीय भूमिका आणि हिंदुत्त्वाचे विचार आजही सोडलेले नाहीत.

112

राज्यात शिवसेनेने भाजपला विरोधी बाकावर बसवल्यानंतर या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपला बौद्धिक अहंकार झाल्याची जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

भाजपचे सूडबुद्धीचे राजकारण

हिंदत्वावरुन शिवसेनेवर टीका होत असल्याचा प्रश्न नीलम ताईंना विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्यात की, आमचे हिंदुत्व हे प्रबोधनकारी हिंदुत्व राहिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवेसेनेला बरोबर घेईल, असे काहींना वाटले नव्हते. त्यावरुनच खोटा प्रचार सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच अमरावती, जळगाव महापालिकेत भाजपने काँग्रेससोबत युती केली होती. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपने छुपी युती केल्याचे सांगत, नीलम गोऱ्हे यांनी हिंदुत्वावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला जशास तसे उत्तर दिले. ज्याला वर्गातला दहाव्या नंबरचा विद्यार्थी समजले जात होते, तो पहिला आल्याने काहींना धक्का बसला आहे. तसेच त्यातून ते अजूनही सावरले नसल्याने काहीही बोलत असल्याचे म्हणत हे सर्व सूडबुद्धीने सुरू असल्याचे देखील त्या म्हणाल्या.

(हेही वाचाः रश्मी ठाकरे होऊ शकतात मुख्यमंत्री…)

तीच तर त्यांची भूमिका

स्थानिक पक्षांना बाजूला ठेवायचे हीच भाजपची भूमिका राहिली आहे. त्याचमुळे शिवसेना गुंडांचा पक्ष आहे. शिवसेनेला काही माहीत नसल्याचा प्रचार केला जात असल्याचे म्हणत, नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेनेने आपली राजकीय भूमिका आणि हिंदुत्त्वाचे विचार आजही सोडलेले नसल्याचेही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.