महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून म्हणजेच गुरुवार ७ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी विधानपरिषधेच्या (Neelam Gorhe) उपसभापती नीलम गोऱ्हे विधीमंडळात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू उद्धव ठाकरे यांनी कधीच ऐकून घेतली नाही, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला.
नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे ?
नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या की, “बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फुटलीच नसती. योग्य ती बाजू घेणे आणि वेळेवर कारवाई करणे, ही बाळासाहेबांची पद्धत होती. तरी संबंधितांनी शिस्त पाळली नाही, तरच कठोर होणं, हा त्यांचा पवित्रा होता. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पक्षाने कधीही त्यांची विचारणा केली नाही. शिंदे यांचे काय प्रश्न आहेत? आमदारांना निधी मिळत नाही, ठिकठिकाच्या जिल्हाप्रमुखांची साधी मागणी होती की, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट करून द्या. पण तीही मागणी पूर्ण होत नव्हती. त्याचा दबावही एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांवर होता.”
(हेही वाचा – CM Eknath Shinde : तुम्हाला नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते)
आमदारांचे म्हणणे कधी ऐकून घेतले नाही…
एकनाथ शिंदे आणि आमदारांचे म्हणणे कधी ऐकून घेतले नाही, असा आरोप करत असताना गोऱ्हे म्हणाल्या की, मी सुद्धा उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की, तुम्ही जिल्हानिहाय आमदारांच्या बैठका घ्या. काही धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत आमदारांनाही निर्णयाबाबत अवगत करा, जेणेकरून आमदारांचा कामातला आत्मविश्वास वाढेल. परंतु याबद्दल काही घडलं नाही. त्यामुळे शेवटी या बाबी धुमसत गेल्या आणि त्याचा स्फोट झाला. ही वस्तूस्थिती आहे. मग अशावेळी या स्फोटाला दुसरा पक्ष जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर आतमध्ये काही अस्वस्थता नसती, तर कुणाला अशी संधीच मिळाली नसती. परंतु राजकीय भूमिका बदललेली होती. मला वाटतं बाळासाहेब असते, तर त्यांनी वेळीच राजकीय भूमिकेबद्दल सावध केले असते. (Neelam Gorhe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community