उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘उबाठा’ गटाला मोठा धक्का बसला. विधानपरिषदेच्या उपसभापती असलेल्या गोऱ्हे यांना शिवसेना प्रवेशानंतर मोठी जबाबदारी दिली जाणार असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नीलम गोऱ्हे यांना सार्वजनिक आरोग्य किंवा महिला आणि बालविकास विभागाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांनी मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बी. एस. ए. एम. (बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी) ही पदवी संपादित केली आहे. त्यामुळे गोऱ्हे यांना आरोग्य मंत्री केल्यास या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती मंत्रिपदावर विराजमान होऊ शकेल.
(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली)
शिवाय त्यांनी हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण या विषयांतही मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांना महिला आणि बालविकास विभागाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांना नेमके कोणते पद मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसरीकडे, शिवसेनेकडून बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाट यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री अब्दुल सत्तारांसह संदीपान भुमरे, तानाजी सावंत यांची खाती बदलली जाणार आहेत.
उपसभापती पदावर कोण?
उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्री केल्यास त्यांच्याकडील उपसभापती पद रिक्त होणार आहे. या पदावर आमदार मनीषा कायंदे यांची नियुक्ती होऊ शकते. त्यांनीही अलीकडेच उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community