सध्या नागपूरमध्ये विधानसभेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. अशातच आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता सडकून टीका केली आहे.
पक्षश्रेष्ठींनीच संजय राऊत यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. नागपुर येथे प्रेस क्लबने आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
(हेही वाचा – Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा रंगणार?)
नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे ?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी पडले आणि त्यावेळी तब्बल दोन ते तीन आठवड्यांसाठी सर्वांचा संवाद थांबला. त्या मधल्या काळात पक्षात नेमकं काय सुरू आहे, नेमकं कोण काय करतंय? अशा बऱ्याच गोष्टी कळेनाशा झाल्या. आमदारांना निधी दिला जात नव्हता, यावरुन त्यांची नाराजी होतीच. तसेच, त्यांची दखल कोणीच घेत नाही, ही खंतही आमदारांच्या मनात होती.
या सर्व गोष्टी मी संजय राऊत यांच्याशी बोलले, मी त्यांना सांगितल की, राऊत तुम्ही आताच जेलमधून आला आहात. आता थोड थांबा, एवढी टोकाची भूमिका घेऊ नका. त्याऐवजी थोडं शांतपणे बोला. १०० टक्के आक्रमक बोलण्यापेक्षा, वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. तसं तुम्ही विचार करा याबाबत.
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आयएएडीबी परिषदेचे उद्घाटन)
यावर राऊत म्हणाले की, “माझं आयुष्य मी समर्पित केलं आहे. मी असाच बोलणार. आता ते असं बोलल्यावर मी काय बोलणार. शेवटी असं आहे की, आपण सांगण्याचं काम करू शकतो. त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणार होतं, पटणारे होते, ते त्यांच्याकडून बोलून घेत होते. मुळे त्यांना पक्षानं बळीचा बकरा केलं, असं माझं मत आहे.”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community