वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-यूजी परीक्षा (NEET-UG 2025) पेपर-पेन (pen and paper mode) यांच्या सहाय्यानेच घेण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने (Central Govt) घेतला आहे. केंद्रीय आरोग्य तसेच शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (16 जाने.) ही घोषणा करण्यात आली. (NEET-UG 2025)
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा निर्णय
ही परीक्षा पेपर-पेनच्या सहाय्याने की ऑनलाइन पद्धतीने घ्यावी या दोन पर्यायांवर सरकारने बारकाईने विचार केला अशी माहिती राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली. एनटीएने सांगितले की, नीट-यूजी परीक्षा एकाच दिवशी व एकाच शिफ्टमध्ये पेपर, पेनच्या सहाय्याने घेतली जाईल असा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) घेतला आहे. २०२४मध्ये नीट-यूजी परीक्षेस २४ लाख विद्यार्थी बसले होते. (NEET-UG 2025)
सीबीआयकडून चौकशी सुरू
नीट-यूजी व यूजीसी-नेट या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप असून त्या प्रकरणांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये काय कारवाई होते याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. (NEET-UG 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community